पंढरपूर: पंढरपूर मोहोळ रस्त्यावर मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिन्ही युवक पंढरपूर शहरातील आहेत. यामुळे पंढरपूर शहरावर शाेककळा पसरली आहे. हा अपघात मध्यरात्री पेनुर गावाजवळ घडला. या अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार एका खासगी बसने चुकीच्या दिशेने येऊन पंढरपूरला निघालेल्या 4 चाकीला धडक दिली.

या अपघातात पंढरपूरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सूरज कदम, ऋषिकेश साखरे, प्रशांत शेटे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांचे नाव असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान शहरातील 3 युवक अपघातात मृत्यमुखी पडल्याने पंढरपूरात शाेककळा पसरली आहे.