अलिबाग तहसीलदार मिनल दळवी लाच लुचपतच्या जाळयात
# दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक
#नवी मुंबई लाचलुचपत विभागाची कारवाई
अलिबाग:-अमूलकुमार जैन
अलिबाग तहसीलदार यांना नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पथकाने अलिबाग तहसीलदार मिनल दळवी यांना दोन लाखाची लाच घेताना अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील निवासस्थानी ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की,अलिबाग तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार यांच्याकडे नांव नोंदणीचे काम करून देण्यासाठी तीन लाखाची लाचेची मागणी केली होती.मात्र दोन लाखांवर तडजोड करण्यात आली होती. तक्रारदार यांना दोन लाखांची रुपये घेऊन गोंधळपाडा येथील निवासस्थानी बोलावले .तक्रारदार यांनी मिनल दळवी यांना दोन लाखाची लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
लाच लुचपत विभागाने तहसीलदार मिनल दळवी याना अटक करताच त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख,पोलीस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि पथकाने ही कारवाई केली आहे.