मेडशी येथील भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशीकर यांच्या शेताच्या बाजूला जिवंत पाण्याचा नाला आहे.या नाल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध असते.मात्र नाल्यावर कुठेच पाणी अडवायची व्यवस्था नसल्यामुळे सदर पाणी वाहत नदीत जात असे.त्यामुळे शेताच्या काठावर असून सुद्धा या पाण्याचा नाल्यालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नव्हता.त्यामुळे पाणी आडवा,पाणी जिरवा मोहिम अंतर्गत वनराई बंधारा टाकून पाणी आडवून ते शेतीस उपयोगात आणू शकतो याचे महत्त्व कृषी विभागाच्या वतीने पटवून दिले असता मेडशी येथील कष्ट करणाऱ्या मोलमजुरी करणारे महिला व पुरुषांनी आपल्या श्रमदानाने या नाल्यावर वनराई बंधारा बांधून त्याचे पाणी आडवले.त्यामुळे आता नाल्यात भरपूर असे मुबलक पाणी उपलब्ध झाले.सर्वप्रथम रिकाम्या सिमेंटच्या बोऱ्यामध्ये मातीमिश्रित रेती भरून त्याचे तोंड बांधून ते कट्टे नाल्याच्या काठावर आडवे टाकले व सर्व कट्टे रचून त्याची भिंत तयार केली.त्यानंतर मात्र काही भागातून अत्यल्प प्रमाणात पाणी पाझरतच होते.तेथे काळी माती टाकून ते बंद केले.आता तेथे भरपूर पाणी उपलब्ध झाले ह्यांचा फायदा त्या नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांना गहू व हरभरा पिके घेण्याकरिता होणार आहे या श्रमदान कार्यक्रमास एस डी कांबळे कृषी पर्यवेक्षक यांच्यासह कृषीसहायक आर बी सोनवणे,व्ही एच ढवळे हे होते.मेडशी गावातील महीलापैकी शांताबाई काळे,पुष्पाबाई घुगे,आशाबाई पवार,पार्वतीबाई कुटे,शारदाबाई कुटे,शोभा करवते तर पुरुषापैकी रमेश करवते,संगपाल तायडे,बंडू व्यवहारे,अजिंक्य मेडशिकर यांनी श्रमदान करत अतीशय उत्कृष्ट अश्या वनराई बंधाऱ्याचे निर्माण केले.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं