करवीर: सहकारी साखर कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील पत्र्याच्या पोखरची मापे घेत असताना पत्रा फुटून खाली पडून सदाशिव यशवंत सुतार (वय ५५, रा. कुरुकली ता. करवीर) या कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज (शुक्रवार) सकाळी सुतार हे कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील पन्नास फुटाहून अधिक उंचीवर असणाऱ्या पत्र्याजवळील पोखरचे माप घेत होते. यावेळी ते सेफ्टीकिट, हेल्मेटसह दोरी बांधून पत्र्यावर चढले होते, परंतु पत्राच फुटल्याने सुतार पन्नास फूट उंचीवरुन खाली पडले. जखमी अवस्थेतच त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. कारखाना स्थापनेवेळी इमारतीवर घातलेले पत्रे ठिसूळ बनले होते.