वाशिम: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसेना शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर अज्ञातांकडून धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाजूला भर दिवसा झालेल्या या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या आहेत. वाशिमच्या सामान्य रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहेत. बातमी अपडेट होत आहे.