तुळजापूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे.या परतीच्या पावसाचा तालुक्यातील जवळगा मेसाई, वडगांव देव,वडगांव लाख, किलज,चिकुंद्रा,सलगरा दिवटी, वानेगाव,यांसह परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला आहे.या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाच्या रानात गुडघाभर पाणी आहे.या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांमद्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या जोरदार पावसामुळे तुळजापुर शहराला जाण्यासाठी असलेल्या तालुक्यातील बारूळ पुलावरून तसेच नळदुर्ग शहराला जाण्यासाठी असलेल्या खंडोबा मंदिराजवळील पुलावरून पाणी जात असल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.शेतकऱ्यांच्या फडात पाण्याचे डबके साचले आहेत.दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अशी तशीच होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत ही दिवाळीपूर्वी देणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया:-
१) यंदा बी दिवाळी साधीच..
गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांची अशीच परिस्थिती होती,यावर्षीही रानात गुढघाभर पाणी साचलंय. तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतलाय.माय बाप सरकार यंदा तरी दिवाळी आनंदात साजरी करू द्याल का..?
भैरू मोटे,शेतकरी,चिकुंद्रा.
२) आमची शेती शिवार पाण्याखाली..
या परतीच्या पावसानं आमचं लय नुकसान झालंय.शेतात गूढघाभर पाणी आहे.शेतकऱ्यांना सरसकट मदत सरकारने मदत लवकर द्यायला पाहिजे.
-दीपक लोखंडे, शेतकरी,जवळगा मसाई.