पुणे: पुणे पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी पेशाने व्यवसायीक आणि वकील करोडपती बंटी बबलीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे शहरात अनेकांना गंडा घालत पोलिसांना चकमा देणाऱ्या बंटी बबलीवर मोठी कारवाई केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांच्या घरातील लक्ष्मी लंपास करणाऱ्या करोडपती बंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात बंटी बबलींनी हातचलाखी करुन लुटण्याचा धुमाकूळ घातला होता. तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांच्या घरातील लक्ष्मी लंपास करणाऱ्या करोडपती बंटी बबलीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील पुरुष आरोपी हॉटेल व्यवसायिक आहे तर त्याची साथीदार असलेल्या महिलेनं वकिलीचे शिक्षण घेतल आहे. मूळचा अमरावतीचा असलेला राजीव काळमे आणि त्याची मेहुणी सोनिया पाटील या दोघांना अलंकार पोलिसांनी मुद्देमालासह बेड्या ठोकल्या आहेत.

कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 नोव्हेंबर रोजी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी हिऱ्यांच्या दागिन्यासह तब्बल 98 लाखांचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. ही चोरी उघडकीस येऊ नये याची पुरेशी खबरदारी चोरट्यानी घेतली होती. असे असताना पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपासले आणि त्यातून ही जोडी पोलिसांच्या हाती लागली.

आश्चर्याची बाब म्हणजे घरफोडी करण्याच्या आधी ही जोडी फॉर्च्यूनर गाडीतून परिसराची रेकी करायचे आणि त्यानंतर बंद असलेल्या घरात प्रवेश करून डाव साधायचे परंतु पुणे पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केल्याने पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.