पाथरी / प्रतिनिधी

तालूक्यातील मौजे पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात सोमवार १० ऑक्टोबर रोजी पालकांच्या ,बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदी मुरलीधर गोंगे तर उपाध्यक्षपदी कल्याण गोंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

      पाथरी तालूक्यातील मौजे पोहेटाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकारणीचा कालावधी संपल्याने २०२२ ते २४ या चालू वर्षासाठी नविन कार्यकारणी निवडी संदर्भात जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक अंभुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली पालकांच्या बैठकीचे आयोजन सोमवार १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी सर्वानुमते पालकांमधून मुरलीधर गोंगे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी कल्याण गोंगे यांची तर, सदस्य म्हणून गजानन सुरवशे,निसरतबी पठाण,शिवाजी कसारे, लक्ष्मण उजगरे, जयश्री उजगरे,कल्पना उजगरे,माणिक बागल,कावेरी गोंगे,दत्ता गोंगे,विजयमाला गोंगे,लता बागल, तर ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणुन मुक्ता गोंगे तर शिक्षण तज्ञ म्हणुन रावसाहेब बालासाहेब गोंगे, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणुन अशोक डांबे तर सचिव पदी अजित खारकर ईत्यादींची निवड करण्यात आली. यावेळी गावचे सरपंच शामराव गोंगे, उपसरपंच गणेश बागल, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब गोंगे, ग्रामसेवक आझम खान पठाण, केंद्रप्रमुख आर.एम.टेंगशे यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी सुत्र संचालन कदम सर यांनी केले तर शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य व जबाबदाऱ्या मिशे सर यांनी सांगितल्या.तर शाळेतील शिंदे सर व गोरे सर यांचे यावेळी सहकार्य लाभले.त्याच बरोबर नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुरलीधर गोंगे यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी सहकार्य करण्याचे आव्हान केले.