*तळेगाव ढमढेरे येथे जुगार अड्ड्यावर छापा*

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील एका शेतामध्ये बेकायदेशीरपणे पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई शिक्रापूर पोलिसांनी सदर ठिकाणची रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करत संदीप उत्तम भुजबळ व रोहन दत्तात्रय ढमढेरे या दोघांसह अनोळखी दोन युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.

                             तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथील एका शेतात काही युवक पत्त्यांच्या सहाय्याने बेकायदेशीर पणे जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस हवालदार किशोर तेलंग यांना मिळाली त्यांनतर पोलीस हवालदार किशोर तेलंग, श्रीमंत होनमाने, अमोल चव्हाण, पोलीस नाईक अमोल दांडगे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना चार युवक पत्त्यांच्या सहाय्याने जुगार खेळत असल्याचे दिसले, मात्र पोलीस आल्याचे कळताच चौघे पळून गेले, यावेळी पोलिसांनी तेथील पत्त्या सह तीन हजार शंभर रुपये रक्कम जप्त केली असून याबाबत पोलीस हवालदार श्रीमंत सर्जेराव होनमाने यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदीप उत्तम भुजबळ व रोहन दत्तात्रय ढमढेरे (दोघे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांच्या सह दोन अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.