गुन्हे शाखेची कामगिरी
वैजापूर
____________________________________
पंधरा दिवसांपूर्वी शहरातील मोबाईल शॉपी चे दुकान फोडून विविध कंपनीचे मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य असा एकूण एक लाख ३९ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. साबीर रईस कुरेशी (२०) राहणार सेलेखाना औरंगाबाद व सरफराज अलीम कुरेशी (२१) राहणार किराडपुरा औरंगाबाद, सिराज सहिद शेख वय (१९) रा कासबंरी दर्गा पढेगाव औरंगाबाद अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून. परी ३३ हजार ६९७ रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे १२ मोबाईल हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचे अधिक माहिती अशी की वैजापूर शहरातील तुम्ही नारायण नगर भागात राहणाऱ्या रवींद्र जगताप यांचे मोबाईल दुकानात चोरी ची घटना २४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, सहायक पोलीस अधीक्षक श्रीमती महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस नाईक शेख नदीम, गणेश गांगवे, दीपक सुरोशे, पोलीस कॉन्स्टेबल संजय तांदळे, योगेश तरमाळे,जीवन घोलप यांच्या पथकाने चोरीच्या घटनेचा तपास केला. तपासा दरम्यान पोलिसांना औरंगाबाद येथील साबीर रईस कुरेशी याच्याकडे चोरी से मोबाईल असून तो त्यासाठी गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्याने औरंगाबाद येथील. सिराज सईद शेख याच्याकडून केवळ पाच हजार ५०० रुपये किमतीत सोळा चोरीचे मोबाईल विकत घेतल्याची माहिती दिली. त्यापैकी पाच मोबाईल ओळखीच्या लोकांना सांगून विक्री केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील अकरा चोरीचे मोबाईल व तो स्वतः वापरत असला एक असे बारा मोबाईल हस्तगत केले असुन त्यांची किंमत ३३ हजार ६९७ रुपये आहे.