चिपळूण : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती संजय राऊत यांच्या बेलची. या एका बातमीनं संपुर्ण महाराष्ट्रात ठिणगी पेटवली आहे. ही बातमी इतकी जोरदार वेगानं फिरतेय की संजय राऊतांच्या समर्थकांनी जगभर जल्लोष करायला सुरूवात केली आहे. अशाच पद्धतीने चिपळूण देखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील जल्लोष केला. शिवसेना जेष्ठ नेते खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर महाविकास आघाडीचा धर्म पाळून चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी जेष्ठ नेते शौकत मुकादम,तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते,शहर अध्यक्ष मिलिंद कापडी,विदयार्थी जिल्हाध्यक्ष सनी आरेकर,चंद्रकांत सावंत,गजानन महाडिक,मदन चांदे,नितीन मोरे,रुपेश इंगावले, राजेंद्र कदम,अमित जाधव,व्याडेश्वर गुहागरकर, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.