संगमेश्वरमधील कोंड असुर्डे गावच्या 12 वर्षीय मुलाने छोटीशी बात या लघुचित्रपटात आपली चमक दाखवली आहे. सांगली येथे छोटीसी बात हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला. तसेच यु टयुब वरही प्रसारीत झाला आहे. या लघुपटात कोंड असुर्डेच्या अथर्वने शिवची भूमिका निभावली आहे. या लघुचित्रपटाचे हितांत देसाई यांनी दिग्दर्शन केले आहे.
अथर्व पोवळे हा मूळ कोंड असुर्डे संगमेश्वर येथील आहे. सध्या तो सांगली येथे वास्तव्याला आहे. तिथे छोटीसी बात हा लघुचित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अथर्व याने या लघुचित्रपटात खोडकर मुलाची (शिव) याची भूमिका निभावली आहे. शाळेमध्ये तो वर्गात बसलेला असतानाही खोडया करतो. क्लास चालू असताना मित्रांवर कागदाचे बोळे करुन मारणे असा त्याचा खोडकर स्वभाव दाखवण्यात आला आहे. मोठया घरातील मुलांसोबत वावरताना त्याला आपल्या गरीबीची लाज वाटते. घरातील साध जेवण त्याला आवडत नाही. घरी आलेल्या पाहुण्यांशी तो उध्दटपणे बोलतो. यावेळी त्याच्या आईने जोरात त्याच्या कानशिलात ठेवून दिली. मोठयांशी कसं वागावं, बोलावं याचे संस्कार आई मुलावर करताना दिसते. अशी या लघुपटाची कथा आहे. छोटीसी बात हा लघुचित्रपट नेट फ्लिक्स इंडिया आणि युटयुब वर प्रदर्शित करण्यात आला आहे.