कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
लहुजी शक्ती सेनेची जिल्हा आढावा बैठक नुकतीच पेरणे फाटा येथे पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत संघटना गावोगावी व तळागाळात पोहचविण्याचे आवाहन उपस्थितांना केले. तसेच यावेळी अनेक लहु सैनिकांनी लहुजी शक्ती सेनेत जाहीर प्रवेश करत अनेकांना पदभार देऊन विष्णुभाऊ कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पद नियुक्त्या करण्यात आल्या.
या वेळी संस्थापक अध्यक्ष विष्णु (भाऊ) कसबे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यमराज खरात, पुणे शहर कोअर कमिटीचे अध्यक्ष अमोल कसबे, जिल्हा अध्यक्ष विजय मोहिते, जिल्हा कोअर कमिटीचे अध्यक्ष नागेश शेलार, जिल्हा समन्वयक अदीक ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष संजय फाजगे, पुणे जिल्हा अध्यक्ष वि आघाडी विजू गाडे, दौंड तालुका अध्यक्ष विलास अडागळे, शिरूर तालुकाध्यक्ष बंटी जोगदंड, उपाध्यक्ष नागेश साळवे, औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष बाळु काकडे, शिरूर ता अध्यक्ष संतोष जाधव, पुणे काँटोमेन्ट विधानसभा अध्यक्ष विशाल अडागळे, श्री. दोडके, बालाजी वाल्हेकर, विकास शिंदे, संतोष दादा काळे, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला फुलाताई थोरात, जिल्हा उपाध्यक्षा अर्चना शेंडगे, हवेली अध्यक्षा सारिका काळे, शिरूर अध्यक्षा मनिषा जाधव, हवेली उपाध्यक्षा रेखा लोंढे व इतर लहुसैनिक उपस्थित होते,
कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक काळे यांनी केले तर आभार नागेश शेलार यांनी आभार मानले.