मुंबई : प्रसीद्ध चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांची महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदि सर्वानूमते नुकतीच निवड करण्यात आली.त्यांची हि निवड संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजुभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थीत करण्यात आली.गोरख भारसाखळे मुळचे औरंगाबाद चे रहिवाशी असुन ते चित्रपट क्षेत्रात 2008 पासुन कार्यरत आहे.त्यांनी आजवर 12 चित्रपट, 2 टि.व्ही. मालीका, 34 लघूपट, 89 आल्बम व 3 वेबसीरीज साठी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.याच पार्श्चभुमीवर त्यांना 7 वेळा "बेस्ट डायरेक्टर" पुरस्काराने व समाज भुषण पुरस्काराने देखील सम्मानीत करण्यात आले आहे.त्याच बरोबर दिग्दर्शक गोरख भारसाखळे हे कलाकारांच्या न्याय हक्कांसाठी दिनरात परीश्रम घेतात व नवोदीत कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून देने व चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या न्याय हक्का साठी अहोरात्र परिश्रम घेवून त्यांना न्याय देण्याचे कार्य गोरख भारसाखळे घेतांना दिसतात त्यांची हिच प्रचिती पाहून त्यांना फिल्म एक्टर असोसीएशन च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन 3 वर्ष, महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश सचिव, चित्रपट कामगार आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणुन तर भारतीय महाक्रांती चित्रपट सेना च्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून तर दैनिक अहिल्याराज च्या सिने विभाग प्रमुख म्हणून हि त्यांनी पदभार सांभाळला.गोरख भारसाखळे 'मुर्ती लहान पण् किर्ती महान' याच म्हणुन हि त्यांची प्रशंसा करण्यात येते.कलाकारांसाठी लढा देणारे लोकनेते राजुभाई साबळे यांनी महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांची सर्वानुमते निवड करुन नियुक्ती करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे, महाराष्ट्र सरचिटणीस सुरेश शिनगारे,मराठवाडा प्रदेश अध्यक्ष सुनील कोतकर,मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात,जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, महिला आघाडीच्या मराठवाडा उपाध्यक्ष अरुणा साठे,मराठवाडा सचिव मंगला पंदिकर,राहुल अंकुशे,जिल्हा उपाध्यक्ष जयनाथ बोर्डे जिल्हा संघटक राजू उजगरे युवा शहर अध्यक्ष विशाल गाडे कैलाश बनसोडे अँड. युवराज जाधव,सुनील कोरके,विजय सदावर्ते,पुष्पा मुखेकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.त्यांच्या या नियुक्ती बद्दल चित्रपट क्षेत्रातील कलाकारांत एक नव चैतन्य निर्माण झाले व महाराष्ट्र भरातुन प्रसीद्ध चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केल्या जात आहे.