पुणे: तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात धानोरी परिसरातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मानसी सचिन शेजुळ (वय 43) आणि उज्वला सचिन बर्वे (वय 48) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. अपघातात सचिन बर्वे (वय 50) हे गंभीर जखमी झाले आहेत.
धानोरी परिसरातील एका सोसायटीत राहणारे दोन कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना सोमवारी रात्री कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाली. यादरम्यान गाडीतील महिला बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर मृत्युमुखी पडलेल्या दोन्हीही महिलांचे मृतदेह विश्वविच्छेदन करुन पुण्याकडे पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे कुटुंबियांसह सोसायटीवर शोककळा पसरली आहे.