औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून सत्तार यांच्यावर टीका केली जात आहे. यावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मत व्यक्त केलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की, "माझी, शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा माझं लक्ष राज्यमंत्रिमंडळाकडे लागलं आहे. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणार का? कारण हा पहिला प्रसंग नाही. याआधी टीईटीचा घोटाळा समोर आला आहे. ओला दुष्काळ कुठे आहे हे देखील समोर आलं आहे.