चिपळूण : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या ध्येयाने प्रेरित होऊन रक्तदानाच्या पवित्र कार्यात उस्फूर्तपणे योगदान देत असणाऱ्या उत्तर रत्नागिरी मधील ब्लडलाईन ग्रुप, चिपळूणच्यावतीने 13 नोव्हेंबर 2022 रोजी पाग मराठी मुलांची शाळा, पाग येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ब्लडलाईन ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने गरजू रुग्णांना तातडीने रक्तपुरवठा करण्यासाठी योगदान दिले जाते. जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीही रक्तदान करणार आहेत. सदर शिबिराच्या प्रोजेक्ट चेअरमन पदी श्री.नरेश मोरे तसेच प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून श्री. स्वप्निल दिवटे यांची निवड करण्यात आली आहे. ब्लडलाईनच्या प्रथेप्रमाणे प्रत्येक शिबिराला ग्रुपमधील दोन नवीन रक्तदात्यांवर अशी जबाबदारी दिली जाते. ज्या रक्तदात्यांना उत्स्फूर्तपणे रक्तदान करावयाचे आहे त्यांनी आपली नावे श्री.अमोल टाकळे 9423296920, श्री.नरेश मोरे 9421894672, श्री.स्वप्निल दिवटे 88 88512368, श्री.सुयोग चव्हाण 9673798623, श्री. प्रकाश गांधी 8788428390, श्री. दिलीप आंब्रे 8291089302 , श्री. नाझीम अफवारे 9764415123, श्री.अभिजीत देशमाने 8888935033, श्री.मिलिंद चितळे 9421098840, श्री. सुनील जानवलकर 9423049243, श्री. प्रसाद पाथरे 9689961792, सौ. निलांबरी वैद्य 9561495616 यांपैकी एका प्रतिनिधीकडे शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 6.00 पर्यंत संपर्क साधून शिबिरासाठी नोंदणी करावी आणि रक्तदानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ब्लडलाईनचे प्रमुख श्री. अमोल टाकळे, प्रोजेक्ट चेअरमन श्री.नरेश मोरे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री.स्वप्निल दिवटे तसेच ब्लडलाईन परिवाराच्यावतीने केले आहे.