पाटोदा (प्रतिनिधी) बीड शहरातील पिंगळे कुटुंबीयांचं सामाजिक राजकीय व्यावसायिक क्षेत्रात विशेष योगदान असल्याने तसेच राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक किशोर आप्पा पिंगळे यांच्या माध्यमातून संघटित झालेलं सामाजिक चळवळीतील जाळ उभारण्यामागे देखील त्यांच्या आईसाहेबांचे मोठे योगदान आहे. सर्वांच्या सुखदुःखामध्ये त्यासुद्धा सहभागी असायच्या सर्व समाजातील युवकांना त्यांनी नक्कीच आजपर्यंत आधार दिलेला आहे. अशा आईसाहेबांचा दुःखद निधन झाल्याने पाटोदा नगरपंचायत,पाटोदा पत्रकार संघ,उद्धव ठाकरे शिवसेना, व नागरिकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सामूहिकरीत्या अर्पण करण्यात आली. सध्या शाहूनगरच्या नगरसेवक आणि सभापती होत्या. विविध विकासकामांच्या माध्यमातून सुद्धा मोठे योगदान राहिले आहे, त्यामुळे जिल्हाभरामध्ये मध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.बीड शहरामध्ये व्यवसायाच्या माध्यमातून उभं केलेलं किशोर आप्पा पिंगळे यांनी जाळ युवकांच्या मनामध्ये घर करून आहे. सुखदुःखामध्ये अडीअडचणीला किशोर आप्पा ज्या पद्धतीने धावून जातात व ज्या ज्यावेळेस आप्पा उपस्थित नसतील त्यावेळेस त्यांच्या बंधूंनी तसेच त्यांच्या आईने देखील बरंच सहकार्य आधार देण्याचे काम केल्याने त्यांच्याबद्दलची आत्मीयता जिल्हाभरामध्ये पाहायला मिळत आहे.पाटोदा नगरपंचायत मध्ये श्रद्धांजली अर्पण करताना पाटोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सोमनाथ कोल्हे, नगरसेवक राजू जाधव, नगरसेवक सतीश घोलप, शिवसेना तालुका अध्यक्ष मुकुंद शिंदे,पञकार गणेश शेवाळे,दत्ता जाधव, महेशर शेख,पप्पू गंचाडे,मिसाळ साहेब, उमेश जाधव,राहुल सोनवने,शिंदे यांच्या सह इतर जन उपस्थित होते