अप्पर पैनगंगा प्रकल्प इसापुर उजव्या कालव्यावरील करखेली शाखा डावी लघु वितरिका क्रमांक.२ चिकना येथून जात असुन ज्या शेतकऱ्याच्या जमिनीतून हा कालवा जात आहे (रामजी लालू इप्तेकर) त्या शेतकऱ्याला नोटीस न देता चुकीच्या शेतकऱ्याला नोटीस देण्यात आले. हे लक्षात येताच रामजी लालू इप्तेकर यांनी २२/११/२०१८ रोजी उपअधीक्षक भूमी अभिलेख धर्माबाद तसेच महितीस्तव जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी धर्माबाद, कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प ८ नांदेड, तहसील कार्यालय धर्माबाद. या सर्वांना अर्ज दिला होता. जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल मिळून ४ वर्ष होऊन देखील अद्याप रामजी लालू इप्तेकर यांना अद्याप शेतीचा मावेजा मिळाला नाही. बाकीच्या सर्व शेकऱ्यांना मावेजा मिळाला आहे. रामजी लालू इप्तेकर व त्यांचे भाऊ यांनी १९८५ व त्यानंतर च्या काळात ६८८ गट क्रमांक असलेले एकूण १० एकर ८ गुंठे जमिनी विकत घेतली. विकत घेतलेल्या खरेदी खतावर देखील ६८८ हाच गट क्रमांक असून आजतागायत ३७ वर्षे होऊन देखील ६८८ हाच गट नंबर त्यांच्या सातबारा उताऱ्यावर आहे. मग यामधे शेतकऱ्याचे काय चूक? शासन दरबारी झालेली गट नंबर च्या चुकीचा फटका शेतकऱ्याला का? तरी देखील शेतकऱ्याने या संदर्भात उपविभागीय अधिाऱ्यांना ५ वेळा समक्ष भेटून हा विषय समजावून सांगितला त्यानंतर उपविभागीय अधिकारी साहेबांनी या विषयावर ५ वेळा सुनावणी घेऊन देखील अद्याप या शेतकऱ्याला न्यान मिलवून दिला नाही. याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाने (बालाजी रामजी इप्तेकर) यांनी आमदार राजेश पवार साहेबांनी दोनदा आयोजित केलेल्या जनता दरबार या बैठकीत पोटतिडकीने हा आपल्या वर होत असलेला अन्याय मांडला. त्यानंतर आमदार साहेबांनी शेतकऱ्याला ८ दिवसात मावेजा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसे आदेश देखील त्यांनी उपविभागीय कार्यालयाला दिले होते. तरी देखील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला न्याय दिला नाही. त्यानंतर च्या काळात दोनदा संयुक्त मोजणी अहवाल मिळून देखील. प्रत्येक अहवालात रामजी लालू इप्तेकर यांची जमिनीवर वहिवाट आहे. तसेच हस्तलिखित सातबारा लिहीत असताना झालेली ही चूक असून आपापसात गट बदली करण्याचे ठरले होते. या संदर्भात तसे आदेश देखील काढण्यात आले होते की कर्यालामार्फत ही दुरुस्ती करून घ्यावी. परंतु अद्याप काहीच काडीमात्र देखील दुरुस्ती झाली नसून. याउलट उपविभागीय अधिकारी यांनी कित्येकदा चुकीच्या शेतकऱ्याला पत्रव्यवहार करून मवेजा उचलून घेण्याचे सांगत आहे. याचा अर्थ काय समजायचं? त्यानंतर बालाजी इप्तेकर यांनी ६ वेळा महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार तक्रार निवारण केंद्रामध्ये आपली तक्रार नोंदविली. आत्मदहनाचा इशारा दिला तरी देखील उपविभागीय अधिकारी यांना याचे गांभीर्य लक्षात का येत नाही. विचार करण्याची गोष्ट अशी आहे की. रामजी लालू यांची एकूण अधिग्रहण होणारी जमीन २६ गुंठे असून, ज्या चुकीच्या शेतकऱ्याला पत्र जात आहे. त्या व्यक्तीच्या नावे फक्त ५ गुंठे एवढीच जमीन असून ती देखील १ किमी दूर आहे. असे असताना देखील उपविभागीय अधिकारी त्या शेतकऱ्याला मावेजा उचलण्याचे आदेश देतातच कसे? सदर जमीन ही रामजी लालू इप्तेकर यांची आहे. व शासन दरबारी झालेली ही चूक आहे. हे सिद्ध झाल्यानंतर देखील शेतकऱ्याला एवढा त्रास का? शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा मावेजा देऊन चूक दुरुस्ती कार्यालयामार्फत झाली पाहिजे. हेच शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याच संदर्भात बालाजी इप्तेकर यांनी तहसीलदार यांची ५ वेळा व भूमी अभिलेख विभागात किमान १० वेळा विचारणा केली. व अर्जाद्वारे विनंती हे सर्व कागदपत्रे शेतकऱ्याकडे असून, आता बालाजी इप्तेकर यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्र्न उपस्थित करून न्याय मिळून द्यावा. व तसेच महसूल कार्यालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी विनंती आमदार राजेश पवार साहेबांकडे केली आहे. अन्यथा मला न्याय न मिळाल्यास याच हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुंबई मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचे विचार करत असल्याचे सांगण्यात आले.