*जालना मध्ये पक्षी संशोधन केंद्र सुरु करत आहे मोरांचा ठेपा - पक्षी संशोधक सूर्यकांत खंदारे*

मोराला भारतीय राष्ट्रीय पक्षी म्हणून 1963 घोषित करण्यात आले आणि वन्यजीव कायादयाच्या अनुसूचित I मध्ये 1972 समाविष्ट करून संरक्षित करण्यात आले.मोराची हत्या करणे, पाळीव करणे ताब्यात ठेवणे हे सगळे प्रकार कायद्याच्या नजरेत शिक्षेस पत्र आहेत.जालन्यात वन क्षेत्र तसे खूपच कमी पण हे माणसासाठी जंगल्याच्या राज्याला याचे काय?जालन्यात तर काही हॉटेल मध्ये मोराच मटण भेटत ही अफवा खुद्द वन विभागाने पसरवली आहे. याचे कारण देताना सांगतात कि वन विभागात मनुष्य बाळ कमी आहे.ज्या हॉटेल मध्ये मोराचे बेत केले जातात, त्या हॉटेल वर वन विभाग का कार्यवाही करत नसेल?जालन्यात तसें कोल्हे लांडगे इतर मांसाहारी प्राणी आहेत.त्यांच्या मुळे सुंदर अन्नसाखळीचे खेळ पाहवयास मिळतात.या खेळामध्ये केव्हा केव्हा मोर पण सामील असतात, या खेळात केव्हा मोराचा ताव मारल्या जातो तर केव्हा थकल्या मोर जिव सोडतो त्यामुळे जंगलात कधी तरी मोरांचे मृत शरीर भेटतात.यात काही नवल नाही कारण मोर काय अमर पट्टा घेऊन नाही आले पृथ्वीवर.मोरांना दाणे खाऊ घालणे, मोरांची आई, मोरांशी मैत्री, मोरांशी नातं इत्यादी मथल्या खाली मोरांना पाळीव करण्याचे प्रकार होत आहेत.मानवी बुद्धी वापरून सर्व काही आधीपात्या खाली आणण्याचे अघोरीं स्वप्न नेहमी पाहिले जाते.स्वतंत्र निसर्गाचा आनंद घेण्या पेक्षा हे माझ्या मुळे आहे असे दर्शवण्यात या लोकांना जास्त आनंद होतो. या सर्व प्रकारस पक्षी संशोधक यांच्या मते एकच उत्तर असेल ते म्हणजे *मोरांचा ठेपा*,ठेपा म्हणजे आधार, ठरलेलं ठिकाण, जिथे मोरांना नैसर्गिक जीवनात जगताना पाहता येईल, त्यांना कुणीही तिथे गुलाम, पाळीव बनवणार किंवा त्यांचे मालक बनणार नाही, त्यांच्या नैसर्गिक जीवन जगण्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उभा करून दानापानी करणार नाही. *मोरांचा ठेपा* जे मोरंच अस्तित्व किती स्वातंत्र्य मुक्त पणे जगात आहे आणि जैविविधता कशा मानवी हस्ताक्षेपशिवाय समवृद्ध असतें हे दर्शवेल.

आपला

एकमेव आधुनिक पक्षी संशोधक

सूर्यकांत खंदारे