पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अंमलदार यांचा सपत्नीक कुटूंबासह सेवानिवृत्ती सेवागौरव.

औरंगाबाद;

औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरुन नियमित वयोमानानुसार दिनांक 31/07/2022 रोजी बारा पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अंमलदार यांचा सपत्नीक कुटूंबासह पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमप्रसंगी त्यांचा सेवागौरव करून आज दिनांक 03/08/2022 रोजी मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मा. डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला आहे. 

       मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त होत असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह व भेटवस्तु देवुन सह कुटूंब त्यांचा सत्कार करून गौरव केला. यावेळी मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कालावधी पर्यंत बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांनी पोलीस सेवे दरम्यान कुटूंबाला पाहिजे तसा वेळ दिला गेला नाही आणि डयुटीच्या अनिश्चित वेळेमुळे स्वत:चे प्रकृतीकडे सुध्दा लक्ष देणे शक्य होत नसल्याने त्यांना निवृत्तीच्या वयात अनेक शारिरीक व्याधीना सामोरे जावे लागते. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करून स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष दयावे तसेच भविष्यातही पोलीसदल हे त्यांच्या सोबतच राहील असे आश्वासन देवुन भावी जिवानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

          सेवा निवृत्त पोलीस अंमलदर यांचे मध्ये 1) सफौ/ शेषराव भावराव चव्हाण, नेम. पो.मु. 2) सफौ/ शेख सत्तार बुढण नेम. पोमु. 3) सफौ/ प्रकाश रामराव घोडके नेम. नियंत्रणकक्ष 4) शेख महेबुब शेख मुनिर नेम. देवगाव रंगारी 5) सफौ/अमरसिंग भाऊसिंग गोटवाल नेम.फुलंब्री 6) सफौ/कल्याण बापुराव जिगे नेम.चिकलठाणा 7) सफौ/ सोनाजी आनंदा तुपे नेम. पिशोर 8) सफौ/ जाफर रहिम पठाण नेम. पो.मु. 9) सफौ/ स्वरूपचंद भिमा वच्हाण नेम.कन्नड ग्रा 10) पोहेकॉ/ नवनाथ रंगनाथ तागड नेम. वैजापुर 11) पोहेकॉ/अशोक शामराव पाथरकर नेम.पो.मु. 12) पोहेकॉ/ सुरेश बबनराव सनवे हे सेवानिवृत्त झाले

  नमुद कार्यक्रम प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, मा. डॉ. पवन बन्सोड यांचेसह सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदार यांचे कुटूंबासह पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते.