कमलगंज: एका तरुणाने आपल्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराची रात्री मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रक्ताने माखलेल्या चाकूसह तो पोलीस ठाण्यात येत त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद जिल्ह्यातील कमलगंजमध्ये घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राजेपूर सराईमेडा येथील भैयालाल जाटव यांची 15 वर्षीय मुलगी गीता (काल्पनिक नाव) हिचे शेजारी राहणाऱ्या महावीर जाटव यांचा 25 वर्षीय मुलगा रामकरण याच्याशी प्रेमसंबंध होते. गीता आणि रामकरण शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून बेपत्ता होते. गीताचा भाऊ नीतू बहिणीच्या शोधात व्यस्त होता. अचानक गीता आणि तिचा प्रियकर रामकरणला पकडले. नीतूने दोघांनाही शृंगीरामपूरच्या संयोगिता मार्गावरील खंटा नाल्याजवळ नेले आणि चाकूने दोघांचा गळा चिरुन खून केला. पहाटे आरोपीने चाकू घेऊन पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती देत गुन्ह्याची कबुली दिली.