तळेगाव: फोनवर झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरुन टोळक्याने सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणाचा निर्घृण खून केला. त्यानंतर काही वेळातच याच टोळक्याने आणखी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. तळेगाव दाभाडे येथे पाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. प्रणव ऊर्फ जय अनिल मांडेकर (वय- १९) रा. इंदोरी, ता. मावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
याप्रकरणी त्याच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सागर रमेश गाडे, रोहन बापू सुरते, अमित श्रीकृष्ण टकले, मंगेश दशरथ हिरे, प्रथमेश गणेश बोरुडे यांना ताब्यात घेतले असून, इतर चार अल्पवयीन आरोपींची चौकशी पोलिस करत आहेत. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. रविवारी (दि. 6) रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान प्रणव हा तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीतील इदगाह मैदानावर त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता.
दरम्यान, त्याचा मित्र विशाल वर्मा व आरोपी मंगेश हिरे यांच्यात फोनवर भांडण आणि बाचाबाची झाली होती. याचा राग मनात धरुन, आरोपी टोळके दुचाकींवरून तेथे आले. प्रणव व त्याच्या मित्रांवर दहशत निर्माण करून त्यांना मारण्यासाठी शस्त्रे हातात घेऊन पाठलाग सुरु केला. जीव वाचविण्यासाठी तेथून तो पळत असताना तुकाराम नगर येथे ठेच लागल्याने प्रणव खाली पडला असता, आरोपींनी कोयता, लोखंडी रॉड, पालघन यांसारख्या हत्यारांनी प्रणव याच्या डोक्यावर वार करून तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रणव याचा मृत्यू झाला. प्रणव हा इंद्रायणी कॉलेज येथे बी. कॉमचे शिक्षण घेत होता. तळेगाव दाभाडे पोलिस अधिक तपास करीत आहेत.
काही वेळातच आणखी एक हल्ला
प्रणव याचा खून केल्यानंतर या टोळक्याने ध्रुव महेश खिल्लारे या तरुणावर देखील कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या टोळक्यातील अल्पवयीन आरोपीच्या मैत्रिणीशी ध्रुव याचा मित्र मौसम शाहू हा बोलतो, मेसेज करतो या कारणावरुन टोळक्याने ध्रुव याच्यावर हल्ला केला. त्याच्या मानेवर कोयत्याने वार केला. मात्र, ध्रुव याने तो वार चुकवून पळ काढल्याने तो बचावला.