राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रिय खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी एका वृत्तवाहिनीवर अतिशय खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा निषेध म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी, महिला आघाडीच्या वतीने सोलापुरातील चार हुतात्मा पुतळा येथे अब्दुल सत्तार च्या फोटोला जोडेमार करून त्या फोटोचे दहन आंदोलन करण्यात आले.
यावेळी "नीम का पत्ता कडवा है, अब्दुल सत्तार भडवा है, पन्नास खोके खाऊन माजलेत बोके, या अब्दुल सत्तार चे करायचे काय? खाली डोके वर पाय, या ED सरकारचा निषेध असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, सुप्रियाताई सुळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अश्या घोषणा उपस्थित राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने देण्यात आल्या.दिवसागणिक सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री महोदय राज्यातील महिला लोकप्रतिनिधी यांच्या बद्दल खालच्या भाषेतील टिप्पणी करत असून त्यांचा स्वतःवरील संयम ढासळत चालल्याचे दिसून येत आहे तसेच पन्नास खोके एकदम ओके ही बाब त्यांना प्रामुख्याने चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे सरकारमधील बेताल वक्तव्य करणाऱ्या अशा मंत्री आणि त्यांच्या वक्तव्याचा यापुढे खरपूस समाचार घेतला जाईल असे यावेळी राष्ट्रवादी महिलांच्या वतीने सांगण्यात आले.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

शहर राष्ट्रवादी आणि महिला आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या ह्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाला प्रदेश सचिव संतोषभाऊ पवार, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, युवक प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, लता फुटाणे, शशिकला कसपटे, वंदना भिसे, पुनम बनसोडे, कांचन पवार, मोनिका सरकार, अमिर शेख, अजित बनसोडे, सरफराज शेख, बसवराज कोळी, मुसा आतार, रुपेश भोसले, मोहम्मद उस्ताद, प्रमोद भोसले, बिरप्पा बंडगर, फय्याज सय्यद, इरफान शेख, नदीम सय्यद, संदेश नारायणे, मोहम्मद इंडिकर, दादाराव रोटे, आकाश रोटे, मयूर रच्चा, सरफराज बागवान, लक्ष्मण भोसले, संजय कुराडे, ज्योतिबा गुंड आदींची लक्षणीय उपस्थिती होती.