मुंबई: सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. सुट्यांच्या दिवशी आपण फिरायला जातो. बरेच जण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत रिसॉर्टवर जातात. पाण्यात खेळतात मनसोक्त आनंद लुटतात. सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय हा सुद्धा असाच एका रिसॉर्ट मधला व्हिडीओ आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरलं होतं असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय एक स्विमिंग पुल आहे तिथे काही जण पाण्यात खेळात आहेत, एवढ्यात एक मुलगा पाण्यात सूर मारताना दिसतोय. त्याच्याबरोबर समोर एक मुलगी आहे सूर मारलेल्या मुलगा समोरील एका माणसाला धडकतो आणि तो चक्क वर उडून खाली फेकला जातो. मात्र त्यावेळी तो तरुणीच्या डोक्यावर पडत पडत वाचतो. अक्षरशः हि तरुणी थोडक्यात वाचते.