पुंगानूर: एका महिलेने आपल्या चौथ्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर या महिलेच्या 34 वर्षीय पतीने गळफास लावून घेतला. मृताचे नाव लोकेश असे असून त्याचा विवाह 9 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील पुंगानूर येथील महिलेशी झाला होता. मृताच्या आईला लोकेशचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
लोकेशला अनेक दिवसांपासून नैराश्याने ग्रासले होते. तीन वर्षांपूर्वी तिसरी मुलगी झाल्याने त्याने आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यावेळी त्याच्या मित्रांनी त्याला समजावून सांगितलं होत. अगदी अलीकडे लोकेशची पत्नी पुन्हा गरोदर राहिल्यानंतर तिला मुलगा होईल अशी त्याची अपेक्षा होती. मात्र चौथी मुलगी झाल्यानंतर लोकेश अस्वस्थ झाला आणि त्याने आत्महत्या केली.