खेड : कोकणात उपलब्ध जागा केंद्राला देऊन लॉजिस्टिक्स पार्क सोबतच किनाऱ्यावरील जागेवर मरीन पार्क ते लोटे औद्योगिक वसाहतीसारख्या ठिकाणी मँगो पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यात कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात नवनवीन उद्योग आलेले आपल्याला पाहायला मिळतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दि. ६ रोजी लोटे येथील उद्योग भवनात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी रविवारी दि६ रोजी भेट दिली. या वेळी उद्योग भवनात उद्योजक संघटना, स्थानिक नागरीक, समाजसेवी संघटना यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध संघटना व व्यक्तींची निवेदने स्वीकरली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी पत्रकार परिषदेत ना. सामंत म्हणाले, लोटे औद्योगिक वसाहती संदर्भात प्राप्त सर्व निवेदनावर पुढच्या आठवड्यात चर्चा करून वेगाने निर्णय घेण्यासाठी उद्योजक संघटना प्रतिनिधी, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील. या औद्योगिक वसाहतीला भेडसावणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करण्यासाठी मी तत्वतः मान्यता दिली आहे. याबाबत आवश्यक निधीच्या तरतूद करण्यात येईल. लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या समस्या सोडवत असताना त्यांच्याकडून देखील माझ्या अपेक्षा आहेत की त्यांनी देखील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांना सुरक्षा साधने पुरविण्याची प्रदूषण होऊ नये, यासाठी कारखानदारांनी काम करण्याची त्यांची जबाबदारी आहे. कोकणासह राज्यात शिंदे व फडणवीस यांच्या नेतत्वाखालील काम करत असलेले सरकार नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच दिल्ली येथे जाऊन मी केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा करणार आहे. गेल्या काळात वेदांता, सॅफ्रोनसारखे प्रकल्प राज्याबाहेर गेले याचे दुःख आहेच, पण त्याही पेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असा विश्वास ना. सामंत यांनी या वेळी व्यक्त केला.
कोकणातील ग्रीन रिफायनरी बाबत ते म्हणाले, रिफायनरी प्रकल्प हा बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारा ठरणार असल्याने त्याचे महत्व स्थानिकांना पटवून देऊन तो करण्याच्या दृष्टीने हे सरकार सकारात्मक आहे. इंधन बचतीसाठी केंद्राकडून पेट्रोलियम पदार्थाच्या पर्यायार्थ हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात आली असून त्याचा अभ्यास करून लवकरच राज्य सरकार हायड्रोजन पॉलिसी लॉन्च करणार आहोत. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय व्हावे, यासाठी गत मंत्रिमंडळातील पर्यावरण मन्त्र्यासोबत मी बोललो होतो परंतु काही झाले नाही. परंतु आगामी कालावधी याबाबत निर्णय घेणार आहोत, असे ते म्हणाले.