ठेकेदाराचा आळस म्हणावा का, राजकीय अडथळ्यांचा कळस म्हणावा असा जनतेतून दबक्या आवाजात सुर निघत आहे धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण, वाहनाची फरफट
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
परभणी प्रतिनिधी
धानोरा काळे ताडकळस या महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने होत असुन धुळीच्या त्रासाने रस्त्याने ये जा करणारे नागरिक हैराण होत आहेत. मागील वर्षभरापासून रस्त्याचे काम चालू आहे काम करणाऱ्या कंपनीच्या मनमानी कारभारामुळे बहुतांशी गावांमधील कामे अर्धवट राहिली आहेत. या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे श्वासनाचे आजार होण्यास धोका वाढला आहे. वर्षभरापासून सदर रस्त्याच्या काम चालू आहे. या कामासाठी सुरुवातीला रस्ता खोदण्यात आला बहुतांशी गावांमध्ये रस्त्याचे काम अर्धवट राहिली आहे दररोज या मार्गाने जाणाऱ्या शेकडो वाहनामुळे धुळीचे लोळ उडत आहेत.
संबंधित कॉन्ट्रॅक्टदार कंपनीकडून रस्त्यावर वेळेच्या वेळी टँकरने पाणी मारल्या जात नसल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. ताडकळस- धानोरा काळे - पालम या रस्त्यावर काम करण्यासाठी खोदकाम केली आहे त्या खोदकामाची देखील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे या गंभीर प्रकारची संबधीत बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे पाणी टॅंकरच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी वाहनचालक व प्रवासी ग्रामस्थ करीत आहेत. धुळी मुळे रस्त्याशेजारी शेत शिवार धोक्यात आले आहेत. पिकावर धूळ साचत असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकर्यांच्या मनात बळावत असताना दिसुन येते आहे. महामार्गाचे काम धीम्या गतीने होत असलेल्या कामामुळे व धुळीच्या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. या मार्गाचे तात्काळ काम करण्यात यावे असे नागरिकातून मागणी जोर धरत आहे.