रत्नागिरी : मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना सरचिटणीस मा. सौ. स्नेहलताई जाधव व जिल्हा अध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांच्या पुढाकारातून रत्नागिरी तालुका मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी रत्नागिरी तालुका मनसे महिला सेनेच्या अध्यक्षपदी सौ प्रियांकाताई आखाडे, तालुका सचिवपदी सौ. आकांक्षा पाचकुडे, खेडशी जि. प. गट तालुका उपाध्यक्षपदी द्वारकाताई नंदाणे, खालगाव जि.प गट तालुका उपाध्यक्षा सौ. अनुराधा गोणबरे, उपविभाग अध्यक्ष वंदना घाणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. याचबरोबर कुवारबाव विभाग अध्यक्ष पदी कु. नेहा खानविलकर, खेडशी विभाग अध्यक्षपदी स्नेहा कुडाळकर, यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मा. श्री. अविनाशजी सौंदळकर, तालुकाध्यक्ष श्री.रूपेशजी जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री.राजू पाचकुडे, मनसेचे पदाधिकरी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.   

मनसे महिला सेना रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी सौ. प्रियांकाताई आखाडे तर तालुका सचिवपदी सौ. आकांक्षा पाचकुडे यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनियुक्त मनसे महिला सेना पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक मनसे शुभेच्छा देण्यात आल्या.