शिरुर: शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे.
शिरुर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळा येथे सुदाम जोरी यांच्या वस्तीवर वनविभागाने सावज असलेला पिंजरा लावला होता. बिबट्याच्या हल्ल्यात सचिन जोरी,पुजा नरवडे यांंना जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून वनविभागाकडून जांबुत परिसरात बिबट्यांंना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जोरी मळा येथे पिंजऱ्यात अडकलेला हा तिसरा बिबट्या आहे.
जांबुत परिसरात वनविभागाने 18 पिंजरे लावलेले आहेत. तर 20 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यामध्ये दोन ठिकाणी बिबट्याचे फोटो मिळाले आहेत. बिबट्याचा वावर, पाऊलखुणा द्वारे पिंजऱा लावण्यात येतो. जोरीमळा येथील कॅमेरा ट्रॅप मध्ये बिबट्या कैद झाला होता. त्यानुसार त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यांत बिबट्या अडकला. या बिबट्याची माणिकडोह येथे बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.