शिरुर: पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेच्या श्री. भैरवनाथ माध्य, उच्च माध्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग करडे शाखेतील हिंदी विषयाच्या व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने (दि. १) नोव्हेंबंर रोजी नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी डॉ. मंचला कुमारी झा.(केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय, हिंदी विभाग केंद्रीय विश्वविद्यालय, काठमांडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

यावेळी राजेश कुमार(संशोधन केंद्र डी.आर.डी चे वैज्ञानिक), आसावरी बापट(निदेशक भारतीय दूतावास) ओम प्रकिशजी (बाल साहित्यकार) डॉ. तुलशी दिवस (टोकियो विश्वविद्यालय) प्रकाश ढगे( साहित्यिक, संपादक) संयोजक प्रमुख कैलास जाधव, केंद्रीय समन्वयक उस्मान मुलाणी, प्राचार्य सोळसे सर, प्राचार्य. रमेश मचाले, राजेंद्र मिसाळ (उपाध्यक्ष पु.जि.शि.मंडळ,पुणे सेवक सह.पतसंस्था, पुणे) इत्यादी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रातील ७० व नेपाळ मधील १६ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. या संमेलनात भारत, नेपाळ संंस्क्रुतीतील सारखेपणा, भाषा विकास यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच कविता सादरीकरण करण्यात आल्या. पुस्तके प्रकाशने करण्यात आली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारसाहेब उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे साहेब, मानद सचिव अँड. संदिप कदम साहेब, उपसचिव एल.एम पवार साहेब, सह सचिव जाधव साहेब, खजिनदार अँड. मोहनराव देशमुख साहेब ई. शारदा मिसाळ यांचे अभिनंदन केले.