नाचनवेल भजनी मंडळींची 35 वर्षांपासून हरिनाम, गायन ,वादन परंपरा कायम  कन्नड तालुक्यातील नाचनवेल कोपरवेल येथील भजनी मंडळ यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली हरी नामाची धार्मिक परंपरा, संस्कृती ,गायन, वादन, हरिपाठ, भजन, काकडा ,आरती, कीर्तन, गवळण सायंकाळी व सकाळी नित्य नियमाने अखंडितपणे चालू राहते, तसेच गाव व पंचक्रोशीतील विविध सप्ताह मध्ये सहभागी होतात. दरवर्षी होणारे धार्मिक कार्यक्रम सण महोत्सव हनुमान जयंती, गणेश चतुर्थी, घटस्थापना, सांस्कृतिक कार्यक्रम, साधू संतांची जयंती, पुण्यतिथी, तसेच आषाढी एकादशी, द्वादशी, दत्त जयंती गोकुळाष्टमी,महाशिवरात्री, श्रावण महिना, कार्तिक महिना, किंवा गावामध्ये दुःखद घटना प्रसंगी , अशा विविध प्रसंगी गावातील महिला पुरुष भजनी मंडळी निस्वार्थपणे हरी नामाचा गजर करत असतात. गावातून दिंडी देखील काढतात यामुळे गावामध्ये उत्सवाचे वातावरण, शांतता, चैतन्य निर्माण होतए