परभणी प्रतिनिधी
धनगर आरक्षण अंमलबजावणी सह समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चासाठी परभणी लोकसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न वर्षे पडून आहे. केंद्र आणि राज्य सरकार हा विषय एकमेकावर ढकलत आहेत. आणि वेगवेगळे पक्षही फक्त समाजाचा मतापुरता वापर करून घेत आहेत या विषयाबद्दल समाजामध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी आणि या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास परभणी लोकसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हरकळ यांनी दिली.