मुंबई दिनांक 13 ऑक्टोंबर 2022
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे खरंच एक जिवंत विद्यापीठ होते, परंतु त्यांच्याच नावाने असलेल्या मुंबई येथील भायखळा येथील नाट्यगृह बंद पडलेले असून, त्या नाट्यगृहाकडे जणू काही कोणाचेच लक्ष जात नाही, असे दृश्य दिसून येत आहे.
सध्या नाट्यगृह बंद अवस्थेत आहे ही शरमेची बाब असून, त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे तमाम लोककलाकारांचा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तुत्वाचा अपमान होताना दिसत आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या बहुजन हिताची विचार करणारे कार्यक्षम असणारे सरकार सत्तेवर आहे,
परंतु मुंबई येथील सभागृहाचे उद्घाटनाचे काम बऱ्याच वर्षापासून रेंगाळलेले आहे हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू व्हावे व त्याचे काम मार्गी लागावे ,तसेच प्रेक्षकांसाठी नाट्यगृह सुरू करावे हाच खरा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गुणगौरव असेल.