रांजणगाव खुरी येथे बिबट्याचा धुमाकूळ...

शेतकरी व नागरिकात भितीचे वातावरण...

औरंगाबाद व जालना येथील रेस्क्यु टिमची घटनास्थळी धाव...

बिडकिन प्रतिनिधी:-

पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असुन काल रात्री शिवाजी इनामे यांचे एक गायीचे वासराला हि आपला जीव गमावावा लागला आहे.सविस्तर माहिती अशी की, रांजणगाव खुरी येथील बल्लाळपुर शिवारासह इतर ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला दिली असता वनविभागाच्या वतीने पुर्ण पाहणी करुन याठिकाणी बिबट्या या ठिकाणावरून गेला असुन आढळुन आलेल्या पंजाच्या खुणा या बिबट्याच्याच असल्याचे सांगितले गेले होते.त्यानंतर बिबट्या आढळलेल्या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा हि लावण्यात आला होता.या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच काल रात्री एका गायीच्या वासराला फाडुन या बिबट्याने पळ काढला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता आज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पुन्हा बिबट्या आढळलेल्या ठिकाणी पाहणी केली असुन आज ही बिबट्या चा थारा न लागल्याने शेतकऱ्यांत असंतुष्ट वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्या आढळलेल्या आजुबाजुला गाय,वासरु,कुत्रे अचानक गायब होण्याचे प्रमाण जास्त वाढत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बिबट्या पडकला पाहिजे असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेतीच्या कामांची लगबग मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून शेतीकामे करावी लागत आहे.यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्या पकडण्यासाठी चे प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप शेतकरी करित आहेत.आज रांजणगाव खुरी येथील बल्लाळपुर शिवारातील शेतकरी शिवाजी इनामे यांच्या शेतात जालना व औरंगाबाद येथील रेस्क्यु टिमने शेतातील घटनास्थळी धाव घेतली आहे.यात औरंगाबाद जिल्ह्याचे वनविभाग अधिकारी सुर्यकांत मखनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग अधिकारी तोवर व पाटील सह वनरक्षक चोरमारे,मार्कंडे,घुशिंगे,साळवे व वाहनचालक अहिरे या टिमने आज रांजणगाव खुरी येथील बल्लाळपुर शिवारासह इतर ठिकाणी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठीचे विविध प्रकारचे प्रयत्न करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक कामे अथवा इतर कामासाठी ग्रुप मध्ये जाण्याचे आवाहन केले आहे.

तरी बिबट्यास लवकरात लवकर पकडण्यात आले पाहिजे अशी मागणी शेतकरी व नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

रविंद्र गायकवाड, बिडकिन