शिरुर: शिरुर शहरासह तालुक्यामध्ये प्रतिबंधीत सिगरेट व अन्य तंबाखुजन्य उप्तादने या प्रकारातील गुडंगगरम व ब्लॅक या सारख्या सिगरेटची तसेच हुक्का फ्लेवर व हुक्का ओढण्यासाठी वापरणारी साधने यांची लपूनछपून विक्री होत होती.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पोलिस उपविभागीय आधिकारी यशवंत गवारी व शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, पोलीस हवालदार परशराम सांगळे, पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, नितिन सुद्रिक, बाळासाहेब भवर यांनी शिरुर शहरासह जांबुत, फाकटे या गावांमध्ये दिलीप गांधी, राजेद्र फिरोदिया, विजय थेऊरकर, राजेंद्र लुनिया, खिवराज फिरोदिया, शाहरुक शेख, शाहबाज शेख यांच्यावर प्रतिबंधित सिगरेट व अन्य तंबाखूजन्य उप्तादने (COTPA) अँक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी सांगितले.