संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा महिला आघाडी तर्फे जाहीर निषेध औरंगाबाद प्रतिनिधी मुंबईमध्ये दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते संभाजी भिडे हे मंत्रालयात गेले असता तेथे एका महिला पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता संभाजी भिडे यांनी त्या महिला पत्रकारास तू पहिले कपाळाला टिकली लावून ये नंतर मी तुझ्याशी बोलतो असे बोलून तिच्याशी बोलणे टाळले त्यांच्या या वक्तव्याचा शहरातील काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला व त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात शहरातील क्रांती चौक येथे संभाजी भिडे यांच्या फोटोस चपला मारण्यात येऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला व संभाजी भिडे यांनी महिला वर्गाची जाहीर माफी मागावी संभाजी भिडे हे प्रसिद्धीसाठी महिलांविरुद्ध सतत काहीतरी वक्तव्य करत असतात अशा या वाचाळ संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने त्वरित कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी ही यावेळेस करण्यात आली. यावेळेस संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी ही केली या कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या