खेड : शहरातील सन्मित्र नगर येथील मजूर वस्तीत झोपडीत एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूवर घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी दि.३ रोजी सकाळी उघडकीस आली. बेबी कादरबादशा नदाफ (वय ४५, सन्मित्र नगर, खेड, मूळ कर्नाटक) असे मृत महिलेचे नाव आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डाक बंगला परिसरात सन्मित्र नगर येथे मोलमजुरी करणारी काही कुटुंब झोपड्यामध्ये राहतात. त्या ठिकाणी गुरुवारी दि.३ रोजी सकाळी एका झोपडीत महिलेचा मृतदेह असल्याचे मजुरांशी संबंधीत मुकादमाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठीं पाठवला.  

या घटने नंतर प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि माहिती घेतली. खेडच्या पोलिस निरीक्षक निशा जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी महिलेचा पती कादरबादशा नदाफ (वय ५०) याला मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार नदाफ दाम्पत्याचे रात्री भांडण झाले होते, असे समजते. त्यामुळे महिलेच्या मृत्यू बाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.