केज :- केज-अंबाजोगाई रोडवर चंदनसावरगाव येथे मोटार सायकवरून पडलेल्या एका चार वर्षाच्या मुलाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, गुरूवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सायकली8 ६:०० वा च्या सुमारास धनराज रतन पवार आणि त्यांची पत्नी हे त्यांचा चार वर्ष वयाचा पुतण्या चि. आशिष खंडू पवार हे अंबाजोगाई वरून मोटार सायकलीने कुंबेफळ ता. केज येथे येत होते. दरम्यान ते चंदनसावरगाव येथील हॉटेल निसर्ग जवळ आले असता आशिष हा गाडीवरून खाली पडला आणि त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या एका भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला चिरडले. यात चि. आशिष खंडू पवार या चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

सदरची घटना ही अत्यंत हृदयद्रावक असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

युसुफवडगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी संपतराव शेंडगे यांना अपघातस्थळी रवाना केले. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रेताची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले असून अपघाताचा पंचनामा करण्यात येत आहे.