धर्माबाद शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची ची विक्री जोरात चालू असतानाच बनावट दारू देखील तालुक्यात ब-याच ठिकाणी विक्री होत आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. धर्माबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये विनापरवाना सर्रास देशी दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत यापूर्वी अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. अनेक गावातील महिलांनी गावात विक्री होणारी अवैध देशी दारू बंद करावी अशा मागण्याचे निवेदन धर्माबाद तहसीलदार साहेब यांना दिले होते. धर्माबाद तालुक्यातील अनेक गावात किराणा दुकानावरून हॉटेलच्या आतुन धाब्यावर सरास देशी विदेशी दारू दारूची विक्री गावागावात सुरू आहे. धर्माबाद येथील एक लोकप्रतिनिधी कडून सायंकाळी बनावट दारू धर्माबाद सह तेलंगणा राज्यांमध्ये अवैध रित्या अनेक दारूचे बॉक्स गावागावात पाठविले जातात त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबाची वाईट अवस्था झाली असून काही घरे बरबाद झाली आहेत. तर अनेकांचे संस्कार उध्वस्त होताना दिसत आहेत. महिलांना दिवसभर रोजंदारी करायला कामाला जावे लागते आणि घरातील पुरुषांनी दारू पिऊन धिंगाणा घालावा, मारहाण करावी, शिव्या द्याव्या, मुलांना शिक्षणाकडे लक्ष नाही, अशी वाईट अवस्था संसाराची होत असल्याने अनेक गावातील महिना त्रस्त झाल्या आहेत. छोटी मुले देखील दारूच्या आहारी जात आहेत. युवक मंडळी सुद्धा दारूच्या व्यसनाने वाया जात आहेत. अवैध देशी दारू गावागावात विक्री होत असल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती अनेक गावात निर्माण झाली आहे. संबंधित उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. धर्माबाद मधून दारूचे बॉक्स अवैधरित्या गावागावात जात असताना दुर्लक्ष केले जात आहे. म्हणूनच खेड्या खेड्यामध्ये दारू विक्री सर्रास चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचे रसायने वापरून लपून छपून एका बंद खोलीमध्ये बनावट दारू तयार केली जात आहे. यापूर्वी धर्माबाद तालुक्यातील करखेली गावाजवळ बनावट दारू बनवते वेळेस धर्माबाद पोलीसांना पकडण्यात यश आले होते व दारू बनावट तयार करणाऱ्या लोकांवर कारवाई देखील करण्यात आले होते. पुन्हा तालुक्यात बनावट दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी दारू विक्री होत आहे. काही विशेष गावावर व धाब्यावर अवैध देशी दारू विक्री जोरात सुरू आहे.होत असलेल्या अवैध दारू विक्री
याकडे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे निरीक्षक मात्र दुर्लक्षित करताना दिसून येत आहे परवानाधारक दुकानदारांना केवळ महिनेवारी भेट देऊन आपले आर्थिक चांगभलं करून घेऊन निघून जातात.शासनाच्या नेमाचे पालन मात्र केल्या जात नाही ग्रामीण भागातील अवैध देशी व विदेशी विक्रीकडे लक्ष नाही बनावट दारू विक्रीचा व्यवसाय भोपावेत आहे तालुक्यात चालू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे.यापुर्वी
नायगाव (ध) येथील महिलांनी धर्माबाद तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन सह नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे देशी दारू च्या दुकानदाराच्या विरोध तक्रार करून नायगाव (ध) येथील देशी दारूचे दुकानाचे परवाना रद्द करण्याच्या निवेदन देऊन पाठपुरावा करून ते देशी दारूचे दुकान बंद करण्यात आले होते. आता नायगाव (ध)येथील देशी दारू दुकान बंद झाल्याने दारूचा परवाना हा धर्माबाद येथे स्थलांतरित करण्याची मागणी त्या मालकाने राज्य उत्पादक शुल्क विभागाकडे केली आहे तरी ज्या आधारे त्यांना नायगाव येथे परवाना मिळाला होता तो परवाना इकडे मिळवून घेण्यासाठी मालकांनी लोकप्रतिनिधीच्या सहाऱ्याने प्रयत्न करीत आहे पण परवाना बदलण्यासाठी तालुक्यातील आत्तापर्यंत किती दारू पिणाऱ्या लोकांकडे परवाना काढण्यात आला आहे याची नोंद देखील राज्य उत्पादकाने घ्यावयाची आहे.