रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे बुधवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास एसटी व खाजगी आरामबस यांच्या अपघात झाला. या अपघातात चालक, वाहाकासह प्रवाशी किरकोळ जखमी झाले.मात्र दोन्हीं वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाता प्रकरणी खासगी बस चालकाविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीदास हरिश्चंद्र कवठणकर ( 63, मुळ. रा. उत्तर गोवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या अपघाताची खबर एसटी चालक साठवाराव गणेशराव येळणे (40, मुळ रा. हिंगोली सध्या रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) दिली.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
बुधवारी पहाटे एसटी बसचे चालक साठवाराव हे आपल्या ताब्यातील प्रवाशांसह चिपळूण-रत्नागिरी असे येत होते. पहाटे 6 वा. सुमारास ते बावनदी येथील वळणावर आले असता गोवा ते मुंबई जाणाऱ्या खाजगी बसवरील चालकाने पुढील ट्रकला आव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या विरुध्द दिशेला येत एसटीला समोरुन धडक दिली.
दरम्यान या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक यांच्या छातीला किरकोळ दुखापत झाली. तसेच एसटीमधील प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्या. दोन्ही वाहनांचेही नुकसान झालेले आहे. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतुक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालया दाखल केले. या अपघातामुळे अंदाजे तीन तास वाहतुक खोळंबलेली होती. त्यानंतर पोलिसांनी खोळंबलेली वाहतुक सुरळीत केली.