सोलापूर- एमआयएम पक्ष हळूहळू संपुष्टात येत असल्यासारखे चित्र सोलापुरात निर्माण झाले आहे.पक्षाला खिंडार पडल्यापासून कार्यकर्त्यांना व पदाधिकऱ्याना मरगळ आली आहे.बुधवारी सोलापूर शहरातील नई जिंदगी ते सीतारा चौक दरम्यान रस्त्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.पण या आंदोलनाला एमआयएम पक्षाच्या सर्व मुख्य पदाधिकऱ्यानी पाठ दाखवली आहे.बोटांवर मोजण्या इतकेच कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षात शिल्लक राहिले आहे.एमआयएमचे संपर्क प्रमुख पालेखान पठाण हे देखील शहर पक्ष प्रमुखाला जनतेपासून दूर ठेवत दिशाभूल करत असल्याची चर्चा सुरू आहे.शहर अध्यक्ष फारूक शाब्दी नेहमीच आपल्या व्यवसायामुळे परजिल्ह्यात असतात.त्यामुळे पक्षात म्हणावी तशी हालचाल नाही.

खिंडार पडल्याने एमआयएमला मोठा फरक-
शहर अध्यक्ष पदावरून फारूक शाब्दी व तौफिक शेख यांमध्ये दुरावा निर्माण झाला.याचे दुष्परिणामही पक्षाला भोगावे लागत आहे.तौफिक शेख यांसोबत असलेला मोठा गट व सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीची घड्याळ हातात बांधली.खिंडार पडल्यापासून एमआयएम पक्षात एल प्रकारची मरगळ आली आहे.हिजाब आंदोलन आणि नुपूर शर्मा याव्यतिरिक्त एमआयएमच्या आजतागायत झालेल्या सर्व आंदोलनात बोटांवर मोजण्या इतकेच कार्यकर्ते शिल्लक राहिले आहेत.

एमआयएम पक्षात दिशाभूल करणारे अधिक-
एमआयएम पक्षात दिशाभूल करणारे नेते अधिक आहेत.संपर्क प्रमुख म्हणून भूमिका बजावणारे पालेखान पठाण हे देखील नेहमी शहर अध्यक्षांना जनतेपासून व कार्यकर्त्यांपासून दूरच ठेवत असतात.शहर अध्यक्ष फारूक शाब्दी हे नेहमी कामानिमित्त किंवा आपल्या व्यवसायानिमित्ताने मुंबई येथे असतात.त्यांच्या गैरहजेरीत संपर्क प्रमुख पालेखान पठाण हे कार्यशुन्य राहतात.