"मेंदूत सुमारे १०० अब्ज न्यूरॉन्स असतात. या मेंदूत नेमकं काय घडतं, का घडतं आणि कसं घडतं याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता असते. मेंदू प्रक्रिया शरीराचा समतोल साधत असते. मात्र मेंदूचे विकार अन् त्याचे कारणही समजून घेण्याची गरज आहे. तोल जाणं, डोकेदुखी असे सर्वसाधारण वाटणारी लक्षणंही मेंदूच्या गंभीर आजाराकडे आपले लक्ष वेधत असतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करणंच योग्य. मेंदूच्या आजाराची अनेक लक्षण असतात. जसं डोकेदुखी, अर्धशिशी, फिट्स, आकडी, लकवा, पक्षाघात, न्युरोपथी, हातापायांना मुंग्या येणं, मानेचं आणि कंबरेचं दुखणं, स्मृतीभ्रंश, कंपवात, मेंदूची गाठ, डोक्याला लागलेला मार, मेंदूचे संक्रमणचा मेंदूच्या विकारांमध्ये समावेश होतो. त्यामुळे हे आजार नेमके काय आहेत हे समजून घेणंही गरजेचं आहे.वेळेवर जेवण, झोप, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार हे या आजाराला नियंत्रित करू शकतात." असे विधान डॉ. आरती कुलकर्णी यांनी पेण येथे मेंदूचे आजार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
जागतिक स्टोक दिनानिमित्त गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत मेंदू विकार निदान आणि फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अमोल सुडके(न्यूरोसर्जन), डॉ.आरती कुलकर्णी (न्यूरोलॉजिस्ट), डॉ. श्रुती द्रविड (फिजिओथेरपी), ध्वनी सतीजा (सायक्रॅस्ट्रीट) यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. रत्नदीप, डॉ. आरती कुलकर्णी, डॉ. अमोल सुडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासह डॉ. समीर, डॉ. श्रुती द्रविड, डॉ.अमोल कांबळे,जेष्ठ पत्रकार विजय मोकल,पत्रकार विनायक पाटील, प्रकाश माळी, रुपेश गोरीवले गॅलक्सी हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.
"मेंदू विकारात सायक्रॅस्ट्रीट उपचार पध्दत लाभदायक ठरत आहेत. ही उपचार पध्दत फक्त मसाज नसून त्याच्यामध्ये व्यायाम असतो. पेशंटचं पुनर्वसन करण्यासाठी त्याला रोजच्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये पेशंट हा पूर्ण स्विमिंग पूल मध्ये असतो किंवा दोन फूट ते चार फूट वॉटर लेवल मध्ये असतो. पाण्याच्यारोधामुळे आणि पाण्याचा गतीमुळे पेशंटला व्यायाम करायला सोपं जातं. जमिनीवर असताना जो पडण्याची भीती असते. ती पाण्यामध्ये कमी होते. पाण्याच्या माध्यमातून सावरण्यासाठी पाणी हे जास्त चॅलेंजिंग माध्यम असते. त्यामुळे पाण्यामध्ये केलं जाणारे उपचार जमिनीवर केल्या जाणाऱ्या उपचारापेक्षा थोडासा वरचा ठरतो. पाण्याबरोबरच जमिनीवरही उपचार घेतले जातात. ही उपचार पद्धती रायगड जिल्ह्यात पेण मध्ये डॉक्टर रत्नदीप यांच्यामुळे करता येत आहे याचे वेगळे समाधान मिळत आहे. या उपचार पद्धतीचा फायदा रोहा, अलिबाग, पेण व इतर तालुक्यातील रुग्णांना नक्कीच होईल." असे उद्गार ध्वनी सतीजा (सायक्रॅस्ट्रीट) यांनी पेण येथील गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये मोफत मेंदू विकार व उपचार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले.
या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्ट्रोक,(पॅरॅलिसिस / लकवा), ब्रेन ट्युमर, ताण-तणाव येणे, डोकेदुखी,पाठीच्या कण्याचे आजार, इपिलेप्सी, स्वतःच स्वतः शी बोलणे, फिट्स/आकडी येणे, न्यायुंचे आजार, डोकेदुखी,स्मरणशक्ती कमी होणे, लैंगिक समस्या, कानात आवाज येणे,मज्जारज्जूचे आजार, भीती वाटणे, नसांचे आजार, इतर मेंदूचे आजार, शारिरीक कमजोरी, भास होणे, चिडचिडपणा, झोप कमी येणे, आत्महत्या करण्याची इच्छा होणे, चक्कर, बेचैन,कंपवात या आजारांवर तपासणी करण्यात आली. एकूण 45 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे पेणकरांसाठी वरदान ठरत आहे. अल्प काळात पेण येथे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या डॉक्टर रत्नदीप व त्यांच्या टीमने या आधी पत्रकार व कुटुंबियांच्या मोफत तपासणी शिबिराबरोबरच जनतेसाठी मूत्र विकार, नेत्र तपासणी व इतर विविध आजारांवर मोफत शिबीर घेतले आहेत.