औरंगाबाद: मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आयाची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाणार...

सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती जमाती, भटके विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्यांक अशा विविध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये सहाय्य करणे त्यांना उच्च शिक्षणात नियमितपणे भाग घेता यावा. आपल शिक्षण पूर्ण करता यावे. त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी निर्वाह भत्ता दिला जातो. आता त्याच निकषानुसार मराठा समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक निर्वाह भत्ता दिला जाणार आहे.

पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना...

केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 प्रमाणे वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. तसेच देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ, संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे, अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.