मध्य प्रदेश: माणूस आणि प्राणी यांच्यातील नाते जगावेगळे आहे. असाच काहीसा प्रकार शाजापूरमध्ये घडला, जिथे एका गायीच्या मालकाने तिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला.
भंवर सिंह खिची यांच्याकडे रानू नावाची 20 वर्षाची गाय होती. या गायीवर संपूर्ण कुटुंबाचे खूप प्रेम होते. ती घरातील सदस्यासारखी होती. 1 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला तेव्हा कुटुंबाने आणि संपूर्ण परिसराने हिंदू विधी प्रमाणे गायीच्या शवाला 100 हून अधिक साड्या नेसवल्या. प्रत्येकजण येऊन तिच्याबद्दल आदर व्यक्त करत होता.
अखेरच्या दर्शनानंतर गाईची अंत्ययात्रा पालिकेच्या वाहनातून बँड-बाजा वाजवत काढण्यात आली. घरातील आणि परिसरातील सर्व लोकांचे डोळे पाणवले होते. जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला.
भंवर सिंह म्हणाले की, राणू आमच्या कुटुंबासाठी 'आई' सारखी होती. ती पण सगळ्या लोकांची लाडकी होती आणि सगळे तिला खूप प्रेमाने राणू म्हणायचे. कोणीही तिला भेटायला आले की शेपूट हलवत ती खूप प्रेमाने भेटत असे. कुटुंब दु:खी आहे. आमच्या कुटुंबातून आमची गाय नाही तर, आमची आई गेली आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.