टाकळी भिमात जुन्या वादातून युवकाला मारहाण

 तळेगाव ढमढेरे,प्रतिनिधी:

टाकळी भीमा ता. शिरूर येथे एका युवकाला जुन्या वादातून दारु पिऊन शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याच्या घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संतोष लोकरे या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. टाकळी भीमा ता. शिरूर येथील आकाश मोहिते व संतोष लोकरे यांचे यापूर्वी वाद झालेले आहेत, आकाश हा त्याच्या घरासमोरून जात असताना संतोष तेथे दारु पिऊन आला त्याने जुन्या वादातून आकाशला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी आकाश प्रतिकार करत असताना संतोषने त्याच्या चावा घेत जखमी केले, याबाबत आकाश मारुती मोहिते वय २१ वर्षे रा. टाकळी भीमा ता. शिरूर जि. पूणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संतोष लोकरे रा. टाकळी भीमा ता. शिरूर जि. पूणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चव्हाण हे करत आहे.