अजब शिक्षण विभागाचे गजब सर्वेक्षण -मनोज जाधव
बीड ( प्रतिनिधी ) : - शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले . यामध्ये जिल्ह्यात ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ५ जुलै ते २० जुलै दरम्यान करण्यात आले . त्यात चक्क दहा बालक शाळाबाह्य आढळून आली तर अनियमित उपस्थिती असलेले केवळ २८ बालके आढळून आले आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता हे सर्वेक्षण कसे झाले असेल या बाबत आशचर्य व्यक्त होत आहे
पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या आणि इतर मजुरांचे होणारे स्थलांतर , कौटुंबिक परिस्थिती , पालकांचे अज्ञान , शैक्षणिक सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे . शिक्षण हक्क कायद्याची ( आरटीई ) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले . सर्वेक्षनामध्ये जिल्ह्यात केवळ १० बालक शाळाबाह्य असल्याचे समोर आला आहे. यात मुले २ तर मुलींची संख्या ८ आहे. तसेच अनियमित शाळेत उपस्थिती असणारे विद्यार्थी ही केवळ २८ एवढीच आहे. यात मुले १६ तर मुलींची संख्या १२ एवढी आहे . या सर्वेक्षणात अंबेजोगाई - २, आष्टी आणि बीड तालुक्यात प्रत्येकी ४ बालके शाळा बाह्य असल्याचे पुढे आले आहे. तर बाकी आठ तालुक्यात शंभर टक्के मुलं शाळेत जातात हे पुढे आले आहे. बीड जिल्हा हा प्रमुख्याने ऊस तोड मजुरांचा जिल्हा आहे . जिल्ह्यात लाखो ऊसतोड मजूर स्थलांतर करतात यात त्यांच्या मुलांची देखील फरपट होते . परिणामी ते शिक्षणा पासून वंचित राहतात . त्याच बरोबर मागील काळात कोरोना मुळे देखील अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत . यातच शिक्षण विभागाने केलेले सर्वेक्षनात चक्क दहा बालक शाळाबाह्य आढळतात त्यामुळे हा सर्व्हे करणाऱ्या मंडळींनी हा सर्व्हे नेमका कुठे बसून केला असेल आणि सर्वेक्षण कसे झाले असले हा संशोधनाचा विषय आहे . असे मत शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे .
सहा वर्ष वय होईपर्यंत अनेक बालके शाळेत जात नाहीत सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते थेट पहिल्या वर्गात प्रवेश घेतात अनेक बालके आजही बालमजुरी करताना दिसतात रस्त्यावर ही त्यांचा वावर असतो येवढेच काय तर शिक्षण विभागा समोर देखील शाळा बाह्य मुले आढळतील मग या सर्व्हेतून ३ ते १८ या वयोगटातील सर्वेक्षणात फक्त दहा शाळाबाह्य बालक कसे आढळले हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे हे अजब शिक्षण विभागाचे गजब सर्वेक्षण असल्याचे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाचे-
या आधी मार्च महिन्यात ही झाले होते सर्वेक्षण
चालू शैक्षणिक वर्षात हे सर्वेक्षण जुलै महिन्यात करण्यात आले मात्र शिक्षण संचालक यांच्या सूचनेनुसार १ मार्च ते १० मार्च २०२२ दरम्यान देखील सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी तर चक्क एकही बालके शाळा बाह्य आढळून आले न्हवते तर अनियमित उपस्थिती असलेले १७७ बालके आढळून आले होते.
सर्वेक्षणामध्ये दहा बालक शाळाबाह्य आढळले संख्या खालील प्रमाणे
तालुके मुले मुली
अंबाजोगाई ०० ०२
आष्टी ०० ०४
बीड ०२ ०२
धारुर ०० ००
गेवराई ०० ००
केज ०० ००
माजलगांव ०० ००
परळी ०० ००
पाटोदा ०० ००
शिरुर ०० ००
वडवणी ०० ००
एकूण ०२ ०८ १०