रत्नागिरी : सकाळ माध्यम समूह यांच्यावतीने शिक्षण , सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करत असल्याबद्दल डॉ.आनंद आंबेकर यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र अंतर्गत गुरुवंदना पुरस्कार आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी.शिर्के यांच्या हस्ते हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.

गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे 23 वर्ष कार्यरत असलेले प्राध्यापक डॉ. आनंद आंबेकर आपल्या विषयाच्या माध्यमातून व्यावसायिकता येण्यासाठी नावीन्य पूर्ण उपक्रम राबवत असतात त्याचाच भाग म्हणून गेली 19 वर्ष महाराजा इव्हेंट मॅनेजमेंट करंडकच्या माध्यमातून तीन दिवसांमध्ये शंभर कार्यक्रम आयोजित करताना लीडर आणि सहकार्य करणारी टीम तयार करण्याचे सातत्यपूर्ण काम करत असतात. सांस्कृतिक विभागातून अनेक सिने, नाट्य, टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणारे त्यांचे अनेक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उत्तुंग कामगिरी केलेले आहेत.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून नाट्य क्षेत्रामध्ये सक्रिय असतात. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना राज्य कार्यकारी सदस्य म्हणून सक्रिय संघटन करत असतात. मराठी समाजशास्त्र परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर बिनविरोध निवड होऊन महाराष्ट्र पातळीवर समाज संशोधन यामध्ये काम करत असतात." रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांची भूमिका" या त्यांच्या संशोधन पीएचडी मुळे अनेक परिचारिकांचे प्रश्न महाराष्ट्रभर लक्षात आणून दिले यामुळेच सकाळ समूहाचा आयडल ऑफ महाराष्ट्र गुरुवंदना पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार, शेखर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.