चिपळूण : राजकीय नेत्यांना गुप्तचर य त्रण चय 1 अहवालानुसारच पोलीस संरक्षण दिले जाते. कुडाळच्या भाषणानंतर माझी सुरक्षा अचानक काढली ठिक आहे. मात्र राज्यातील विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यामध्ये मला राजकीय वास येत असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी केला. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यात भिती निर्माण करण्यासाठीच भाजपने सुरक्षा काढल्याचेही आमदार जाधव यांनी सांगितले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आमदार जाधव म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले होते. त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला धमक्या येत होत्या. हा विषय समजल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सुरक्षा पुरविली होती. त्यानंतर मी जिल्हा पोलीस अधिक्षकांना स्वतःहून पत्र लिहून माझी सुरक्षा कमी करण्यास सांगितले. गरज नसताना मी कधीही संरक्षण घेतले नाही. महाराष्ट्रात फिरत असल्यामुळे मात्र दोन पोलीस अधिकारी माझ्याबरोबर कायम असायचे. माझ्या मुंबईच्या घरी व चिपळूण येथेही संरक्षण होते. राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्यामागे गृहविभागाचे काहीतरी कारण असते. शिवसेनेचे ४० आमदार फुटून ते सुरतला गेले. तेथून गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले. तेथून ते महाराष्ट्रात आले. तीन्ही राज्यात भाजपचे सरकार असताना तेथे केंद्र सरकारने ४० आमदारांना सुरक्षा पुरविली. ४० आमदार गोव्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला म्हणजे महाराष्ट्रातही भाजपचे राज्य असताना ४० आमदारांना केंद्राने सुरक्षा पुरवली. माजी खासदार किरिट सोमय्या, अभिनेत्री कंगणा राणावत, आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांवर आरोप करतात म्हणून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोळे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांची सुरक्षा काढण्यामागे मला राजकीय वास येत आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठीच शिंदे-भाजप सरकार हे कृत्य करीत असल्याचा आरोप आमदार जाधव यांनी केला.