शिरुर: घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी पैलवानांचे प्रेरणास्थान असलेल्या आत्माराम फराटे आणि गोविंद फराटे यांच्या बाबत कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते दोघे माझ्या अंगावर धावून येत होते. अरे तिथं काय आखाडा आहे का...? असे वक्तव्य करत त्यांच्यासह कुस्तीक्षेत्राला कमी लेखले म्हणुन तालुक्यातील पैलवानांकडुन निषेध व्यक्त करण्यात येत असुन कुस्तीक्षेत्र पवित्र असून पैलावानांचे आराध्यदैवत श्रीराम भक्त हनुमान यांनी अहंकारी रावणाची लंका दहन केली होती. शिरुर तालुक्यातील या अहंकारी रावणाची लंका पैलवान मंडळी, घोडगंगाचे शेतकरी सभासद आणि सामान्य नागरिक नक्कीच संपवतील असे मत रामभाऊ सासवडे यांनी व्यक्त केले.

शिक्रापूर (ता.शिरुर) येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी व सुखासाठी आम्ही घोडगंगा किसन क्रांती पॅनलला पाठिंबा देत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही घोडगंगा किसान क्रांती पॅनलला बहुमत मिळवून देण्यासाठी शिरुर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आणि सभासद प्रयत्न करत असून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड त्यांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठिंबा जाहीर केला असुन उसाला प्रतिटन ५०० रुपये बाजारभाव कमी मिळत असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घोडगंगा किसान क्रांतीला जाहीर पाठिंबा दिला असल्याचे बाळासाहेबांची शिवसेनेचे शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणारा आणित्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना वाचला, तर शेतकरी वाचेल. तसेच तालुक्यातील सहकार क्षेत्र वाचेल. त्यासाठी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेतकरी वाचला पाहिजे त्याचे आर्थिक हित साधले पाहिजे या भूमिकेतून आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी घोडगंगा किसन क्रांती ला पाठिंबा देत असल्याचे यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिरुर तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने "घोडगंगा किसान क्रांती पॅनल" ला पाठिंबा देऊन आम्ही सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत करु तसेच आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या निवडणुकांमध्ये भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार असुन त्यामुळे निश्चितच यश मिळेल असे मत बाळासाहेबांची शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद यांनी व्यक्त केले. 

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरूर तालुका अध्यक्ष रामभाऊ सासवडे, पुणे भाजपा सरचिटणीस रघुनंदन गवारे, जिल्हा सल्लागार रोहिदास शिवले, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, तालुका संघटक दत्तात्रय गिलबिले, उपतालुका प्रमुख शरद नवले, गणेश कोतवाल, संतोष वर्पे, सागर दरेकर,कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य तेजस नवले, भारत नवले, कारेगाव शाखा प्रमुख विकास नवले, उपविभाग प्रमुख अभिजित गवारे, दशरथ नागवडे, गोरक्ष पवार, उपतालुका प्रमुख संजय पवार, मच्छिंद्र कदम, दत्तात्रय वाजे आदी उपस्थित होते.